राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनचा योगेश धोंगडे उपविजेता

जळगाव दि. 28 प्रतिनिधी –विशाखापट्टणम येथे नुकताच संपन्न झालेल्या २८व्या राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चा खेळाडू योगेश धोंगडेने नामवंत खेळाडूंचा पराभव करून उपविजेतेपद प्राप्त केले. त्यात प्रामुख्याने सध्याचा विश्वविजेता खेळाडू संदीप दिवे याचा उपांत्यफेरीत तसेच सध्याचा विश्वउपविजेता खेळाडू आयकर विभागाचा अब्दुल रहेमान याचा  चौथ्या फेरीत पराभव केला.

तत्पूर्वी दुसऱ्या फेरीत सिव्हिल सर्विसेसच्या एम.अशोककुमारचा, तिसऱ्याफेरीत पेट्रोलियमच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू के. रामेश्बाबुचा आणि उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या विकास धारियाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र तो उत्तरप्रदेशच्या मोहम्मद आरिफ विरुद्ध पराभूत झाला. योगेश धोंगडे यास रोख रुपये १५,०००/- आणि चषक पारितोषिक तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीकरिता महत्वपूर्ण सात गुण प्राप्त झाले. त्याच्या या यशस्वी कामगिरी करिता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, मुख्य प्रशासकीय क्रीडाधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसिन आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here