चोर समजून झालेल्या मारहाणीत मृत्यू – खूनाचा गुन्हा दाखल

जळगाव : उभ्या कारचा दरवाजा उघडत असलेल्या तरुणास तो चोर असल्याचे समजून चौघांनी काठी व बॅटने बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यु झाला. 22 डिसेंबर व 23 डिसेंबरच्या दरम्यान रात्री घडलेल्या या घटने प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मेंद्र महिपत लोधी (राजपूत) (रा. बदोरा जि. झांशी उ.प्र.) असे मयत तरुणाचे नाव आहे. धर्मेंद्र लोधी हा तरुण भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील बी. जी. जिमच्या बाजुला मनोज बुटासिंग चितोडिया यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारचा दरवाजा उघडत होता. त्यावेळी तो चोर असल्याचे समजून जमेरसिंग चितोडीया व पप्पूसिंग चितोडीया व इतर दोघा अनोळखी इसमांनी त्याला काठी व बॅटने मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. अमोल रामचंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बबन जगताप करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here