फिरवला चॉपर, दाबला ट्रिगर आणि माजवली दहशत

जळगाव : चॉपर आणि बंदूकीच्या बळावर दहशत माजवून दोघांना जखमी करणा-यांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल रामभाऊ चोरट आणि जितेंद्र दिवाकर महाजन (दोघे रा. मारोती मंदीराजवळ हमालवाडा शिवाजीनगर) अशी जखमींची नावे आहेत. 26 डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागात ही घटना घडली.

कार्तिक भोसले या तरुणाने सुनिल चोरट या तरुणावर चॉपर फिरवला असता त्याने मागे सरकून वार चुकवला. त्यावेळी शंभू भोसले याने खतमच करतो असे म्हणत त्याच्या हातातील बंदूकीचा ट्रिगर दाबला. विशाल वाघ याने दहशत पसरवण्याच्या हेतूने सुनिल चोरट यास मारहाण करुन त्याची मोटार सायकल खाली पाडली. विशाल वाघ याने सुनिलसोबत असलेल्या जितेंद्र महाजन याच्या पाठीवर चॉपरने वार करुन त्याला जखमी केले. या घटनेप्रमाणे सुनिल चोरट याने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर पुढील तपास करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here