तमाशात गाण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत

जळगाव : तमाशात आवडीचे गाणे लावण्यावरुन दोन जणांमधे झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीतील खेडी या गावी घडली. या घटनेत तरुणाला मारहाण करणा-या मुख्य संशयीत आरोपीसह इतर नऊ जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमाशामधे प्रेक्षक म्हणून हजर असलेल्या भोला साहेबराव पाटील यास त्याच्या आवडीच्या गाणे हवे होते. दरम्यान शुभम रावते यास त्याच्या आवडीचे गाणे हवे होते. दोघे जण त्यांच्या आवडीचे श्रवणीय गाणे तमाशातील कलाकारांकडून ऐकण्यास इच्छुक होते. त्यावरुन दोघांमधे वाद झाला. यावेळी शुभम रावते याच्या बाजूने खंडू फकिरा रावते याने पुढाकार घेतला होता.

30 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास खंडू फकिरा रावते हा ट्रॅक्टर घेऊन शेतात जात असतांना भाऊसाहेब देवराम पाटील, भोला साहेबराव पाटील, बंसीलाल रघुनाथ पाटील, रघुनाथ देवराम पाटील, निंबा किरण पाटील, अशोक किरण पाटील, प्रविण दयाराम पाटील, सुनिल जयराम पाटील, भागवत सुनिल पाटील, चेतन सुनिल पाटील आदींनी त्यास अडवले. आमच्या पोरांना तमाशात मारहाण का केली या कारणावरुन सर्वांनी खंडू रावते यास अडवत मारहाण केली.

खंडू रावते यास होणारी मारहाण बघून त्याचा मेहुणा मच्छिंद्र मोरे याने मध्यस्ती करत आपल्या शालकाचा बचाव करण्यास सुरुवात केली. मध्यस्ती करण्यास आलेल्या मच्छींद्र मोरे यास सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. त्यावेळी भोला पाटील याने हातातील लोखंडी फायटरने खंडू रावते याच्या तोंडावर मारुन दुखापत केली. या घटनेप्रकरणी मच्छिंद्र हरी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊसाहेब पाटील व इतर नऊ जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक अनवर तडवी करत आहेत. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here