सर्वशाखीय सोनार समाज बांधवांना आवाहन

“सोनार समाजाचे अभेद्य संघटन – काळाची गरज आणि युवा पिढीची भुमिका” या विषयावर  मराठी / हिंदी / गुजराती / इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत भाषण करतानांचा व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन सर्वशाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनींना करण्यात आले आहे. ऑल इंडिया सोनार फेडरेशन, सकल भारतीय सोनार समाज संघटन, ऋग्वेद सुवर्ण वार्ता, सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि ऑल इंडिया सोनार फेडरेशन यांनी या भाषणाच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मोबाइल आडवा धरून साधारण तिन ते चार मिनीटांचा हा व्हिडीओ 9764957362 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपले नाव आणि आडनाव, राहण्याचे ठिकाण – गाव/ शहर, तालुका, जिल्हा, राज्य अशा माहितीसह पाठवण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेची अंतीम मुदत दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत राहील. मुदतीत आलेल्या व्हिडिओमधून तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पहिले तीन आणि उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना सन्मानपत्र तसेच उर्वरित स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र (डिजिटल स्वरूपात) देण्यात येईल. या स्पर्धेत अधिकाधिक सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक तथा स्पर्धा समन्वयक सकल भारतीय सोनार समाज संघटन यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9764957362 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here