जैन इरिगेशनमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह

जळगाव – जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह ११ ते १५ जानेवारी २०२४ राबविण्यात येत आहे. त्याची औपचारिक सुरुवात आज झाली. या वर्षाची संकल्पना  ” रस्ता सुरक्षेचे नायक व्हा ” Be a road safety Hero या प्रमाणे आहे.  सर्व सहकार्यांना वाहतूकीचे नियमांचे पालन न करणे,अधिक वेगाने गाडी  चालविणे, हेल्मेट न वापरणे,सिट बेल्टचा वापर न करणे इत्यादी गोष्टी करू नयेत. त्याविषयी जनजागृती व विषयावर प्रक्षिशण देण्यात आले. 

रोडवरील छोट्याशा चुकीमुळे अपघात होतात, कुटुंबाची वाताहत होते झाल्याचे , सहकाऱ्यांना वाहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे तरीही,”शुन्य अपघात असा संकल्प ” त्याच प्रमाणे हेल्मेट वापरणे, सिट बेल्टचा वापर करणे, कमी वेगाने गाडी चालवणे,वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे, अशा विविध संबंधीची सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. जैन फूडपार्क मेन गेट,सोलर एनर्जी पार्क येथे सुरक्षा विभागामार्फत कैलास सैंदाणे सुरक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती देण्यात आली,”आपली सुरक्षा,  हीच परिवाराची रक्षा, रस्ता सुरक्षेचेलक्ष्य ठेवा असे सांगण्यात आले. या वेळी कंपनीचे मानव संसाधन विभागाचे अधिकारी, पी.एस. नाईक, जी आर पाटील, एस.बी. ठाकरे, वाय.जे. पाटील आदी अधिकारी वर्ग देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here