सेंट जॉर्ज रुग्णालयातील उपचाराने भारावले पत्रकार भगवान सोनार

जळगाव : जळगाव येथील धडाडीचे युवा पत्रकार भगवान सोनार गेल्या एक महिन्यापासून मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पीटलमधे वैद्यकीय उपचार घेत होते. त्रासदायक ठरलेल्या “व्हायरल न्यूमोनिया” आजारातून ते बरे  झाले आहेत. जळगावऐवजी मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पीटलमधील वैद्यकीय उपचार उपयोगी पडल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला एकप्रकारे जीवदान मिळाल्याची त्यांची भावना झाली आहे. हे केवळ सेंट जॉर्ज हॉस्पीटलमधील वैद्यकीय स्टाफच्या सहकार्याने झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.

दि. 21 डिसेंबर 2023 रोजी पत्रकार भगवान सोनार यांना खोकला सुरु झाला आणि त्यांना जबर  ताप येऊन ते आजारी पडले. जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान वैद्यकीय सल्ल्यानुसार छातीचा एक्सरे काढण्यात आला. छातीत पुर्णपणे कफ पसरला होता. त्यामुळे सोनार यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे छातीचे सिटीस्कॅन करण्यात आले. अधिक उपचारासाठी 23 डिसेंबर रोजी दुस-या दवाखान्यात त्यांना दाखल करण्यात आले. याठिकाणी ऑक्सीजन लाऊन उपचार सुरु करण्यात आला. सर्वप्रकारच्या तपासणीअंती व्हायरल न्युमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे त्यांना तातडीने अ‍धिक  उपचारासाठी मुंबई येथे नेण्याचे निश्चित करण्यात आले. 22 डिसेंबर रोजी कार्डीयाक आयसीयु अ‍ॅम्ब्युलंसने पत्नी, सासू, भाऊ आणि दोघा मित्रांच्या सोबतीने त्यांनी मुंबई गाठली.  

जे. जे. रुग्णालयात व्हेंटीलेटरचा बेड उपलब्ध नसल्यामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. येथून त्यांचा उपचार सुरु झाला. श्वास नियंत्रणात राहण्यासाठी बायपास व्हेंटिलेटर लावण्यात आले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि  स्वत: भगवान सोनार यांनी वैद्यकीय उपचारास दिलेला प्रतिसाद आणि  त्यांच्या नातेवाईकांची धावपळ या सर्वांचे फळ मिळण्यास सुरुवात झाली. त्यांची प्रकृती बरी झाली असून ते मंगळवारी जळगावला येत  आहेत.

विभागप्रमुख डॉ. विद्या नागर, सहयोगी प्रा. डॉ. मधुकर गायकवाड, सहायक प्राध्यापक डॉ. निलीमा वानखेडे (एम डी फिजिशीयन) यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली डॉ .चेतन यादव, डॉ. पवन कुटे, डॉ .आदित्य कुमार, डॉ.विक्रम जाधव, डॉ.काजल मुळीक, डॉ. आशुतोष पांडे आदी जनरल फिजिशीयन यांच्या सहकार्याने पत्रकार भगवान सोनार यांची प्रकृती सुधारली आहे. उद्योगपती अशोकभाऊ जैन, लकी अण्णा टेलर, आ. राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, रवींद्र शर्मा, आरोग्यदुत रामेश्वर नाईक यांनी आपल्याला वेळोवेळी खंबीर साथ दिल्याचे सोनार यांनी आवर्जून म्हटले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी इश्वराचे आभार मानले आहे. मुंबईसारख्या शहरात आपल्या परिवाराची जी  हाल अपेष्टा झाली याचे त्यांना दुख: आहे. मात्र त्यांनी आपल्यासाठी ज्या यातना सहन  केल्या याची त्यांना जाणीव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here