बेवारस बालकाची ओळख पटवण्याचे आवाहन

जळगाव : भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पुलानजीक एका पुरुष जातीचे एक बेवारस बालक आढळून आले आहे. आढळून आलेल्या देखण्या व गोंडस बेवारस बालकाची ओळख  पटवण्याचे आवाहन भुसावळ रेल्वे पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. आढळून आलेल्या या  बालकाचे अंदाजे वय तीन ते चार महिने आहे.

भुसावळ लोहमार्ग रेल्वे पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्टेशन डाऊन सिग्नल क्रमांक 161 कि.मी. 443/22 लोखंडी पुलाजवळ फोर लाईनच्या उजव्या बाजूस हे बालक आढळून आले. या बालकाचा रंग  गोरा आणि अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट व पिवळ्या रंगाचा लंगोट डायपर लावलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या या बालकाची कुणाला काही माहीती असल्यास भुसावळ लोहमार्ग रेल्वे पोलिस स्टेशनला 02582-222338 या लॅंडलाईन क्रमांकावर अथवा 95619494965 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक प्रविण निकाळजे यांनी केले आहे.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here