पोलिस निरीक्षक नजन यांची गोळी झाडून आत्महत्या

नाशिक : नाशिकच्या अंबड पोलिस स्टेशनचे दुय्यम पोलिस निरीक्षक अशोक नजन  यांनी स्वत:वरच पोलिस स्टेशनच्या दालनात पिस्टलची गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे.

अंबड पोलिस स्टेशनला आपल्या कॅबीनमधे दुय्यम पोलिस निरीक्षक अशोक नजन बसले असतांना अचानक गोळीचा आवाज आला. पोलिस स्टेशनमधील सहका-यांनी त्यांच्या कॅबीनमधे धाव घेत पाहिले असता त्यांच्या आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमागील कारण अद्याप समोर आले नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here