क्रिकेट प्रिमियर लीगच्या माध्यमातून तेली समाज एकत्र येण्यास मदत – अभियंता प्रशांत सोनवणे

जळगाव : तेली समाज क्रिकेट प्रीमियर लीग च्या माध्यमातून समाज हा एकत्र येण्यास मदत होत असून सामाज संघटनेचा केंद्रबिंदू  तेली समाज प्रीमियर लीग ठरावी असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी केले. समाजाच्या मागील वर्षी प्रमाणे यंदा ही समाज प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा या उत्साहात संपन्न झाल्या.  दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान शहरातील शिवतीर्थ मैदान येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत एकूण संघांनी सहभाग नोंदवला होता त्यात डी.ओ चौधरी वारियर उप विजयी तर भारत प्रिंटर या संघाने विजयी सलामी दिली. तृतीय क्रमांक अतिथी ग्रुप जळगाव तर चतुर्थ क्रमांक मनोज आप्पा क्रिकेट क्लब जळगाव ने पटकावला

या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.खेळाच्या माध्यमातून युवक एकत्र येतात ही आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले. तर त्यांच्या समवेत विजय चौधरी संतोष चौधरी बबन चौधरी पुरुषोत्तम चौधरी सुरेश नाना चौधरी शिवलाल चौधरी जीवन चौधरी मणिलाल चौधरी शैलेश चौधरी कमलाकर चौधरी दिलीप चौधरी विनोद चौधरी डिगंबर चौधरी संतोष महेश्री विशाल महेश्री  स्वप्निल चौधरी किशोर चौधरी शिवाजी पाटील दिगंबर पाटील निर्मला चौधरी जे बी चौधरी रामचंद्र चौधरी निलेश चौधरी बंटी चौधरी निर्मला चौधरी आदी उपस्थित होते.

या स्पर्धा यशस्वीतेसाठी तेली प्रीमियर लीग चे प्रशांत सुरळकर विशाल पाटील जितेंद्र चौधरी राहुल चौधरी चेतन चौधरी आशिष चौधरी पंकज चौधरी मंगेश चौधरी मनोज चौधरी प्रितेश चौधरी प्रदीप चौधरी सागर चौधरी नरेंद्र सोनवणे रवींद्र तायडे नयन चौधरी मोहित चौधरी उमेश चौधरी राहुल चौधरी येथे चौधरी तूनेश चौधरी गणेश चौधरी दीपक चौधरी हरीश पवार व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here