चोरीच्या तिन मोटारसायकलींसह दोघांना अटक

जळगाव : चोरीच्या तिन मोटार सायकलींसह दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेतील दोघांचा अजून एक साथीदार निष्पन्न करण्यात आला आहे. अटकेतील दोघांकडून हस्तगत करण्यात आलेल्या तिन मोटार सायकली चोरीचे गुन्हे अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल असून ते उघडकीस आले आहेत.

सध्या जळगाव जिल्ह्यात मोटार सायकल चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते तसेच उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या सहका-यांना तपासकामाच्या सुचना दिल्या होत्या. दरम्यान पो.नि. किसनराव नजनपाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे जळगाव तालुक्यातील रिधुर या गावातून आकाश गोरखनाथ सोनवणे आणि मयुर भगवान कोळी या दोघांना पोलिस पथकाने ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. चौकशीअंती दोघांनी आपले मोटार सायकल चोरीचे गुन्हे कबुल करत चोरीच्या तिन मोटार सायकली काढून दिल्या.

दोघांनी चोरी केलेले तिन्ही मोटार सायकल चोरीचे गुन्हे अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल असून ते उघडकीस आले  आहेत. पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलवार पो.हे.कॉ. जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, अकरम शेख, महेश महाजन, बबन पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी आदींनी या तपासकामी सहभाग घेत कारवाई केली. या कारवाईकामी जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे अमंलदार रामकृष्ण इंगळे व अभिषेक पाटील यांनी सहकार्य केले. पुढील कारवाईकामी दोघा गुन्हेगारांना अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here