त्या दोघा पोलिस कर्मचा-यांची बदली

जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमधील त्या दोघा पोलिस कर्मचा-यांची बदली झाली आहे. आर्थिक, शाब्दिक वाद आणि धक्काबुक्की हे या बदलीमागचे कारण म्हटले जात आहे. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या दोघा कर्मचा-यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.

एमआयडीसी पोलिस स्टेशनमधील या दोघा कर्मचा-यांपैकी एकाची मेहुणबारे आणि  दुस-याची यावल पोलिस स्टेशनला बदली झाली आहे. आठ दिवसांपुर्वी घडलेल्या या घटनेची बदलीत झालेली परिणीती आठ दिवसातच दिसून आली आहे. तथापी बदली हा विषय पोलिस अधिकारी आणि  कर्मचा-यांसाठी नवा नसतो. विंचवाचे बि-हाड पाठीवर या म्हणीप्रमाणे बदलीच्या जागी जावून काम करुन आपली कार्यक्षमता दाखवण्याची देखील धमक बहुतांश पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांमधे असते. “डर के आगे जीत है” असे मनाशी म्हणत असे अधिकारी – कर्मचारी आपले अस्तित्व प्रस्थापित करतात. केवळ एखादा ठपका लागून बदली होवू नये असे प्रत्येक अधिकारी कर्मचा-याला वाटत असते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here