जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आला. सकाळी दहा वाजता जळगाव शहर वाहतुक शाखेच्या कार्यालयापासून महिलांसाठी मोटर सायकल हेल्मेट रॅली यावेळी काढण्यात आली.
शहर वाहतुक शाखा कार्यालयापासून सुरु झालेली रॅली कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक व पुन्हा कोर्ट चौक मार्गे शहर वाहतुक शाखा कार्यालय प्रांगणात आणून समाप्त करण्यात आली. या रॅलीत जळगाव जिल्हा पोलीस दलातील महिला अधिकारी, अंमलदार, पोलीस कुटुंबिय व जळगाव शहरातील महिला आदींनी वेगवेगळ्या पारंपारीक वेशभुषेत सहभाग नोंदवला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन या रॅलीची सुरुवात केली. ‘बेटी बचाव- बेटी पढाव’, ‘स्त्री शक्तीचा सन्मान’, ‘मुलगी शिकवा-देश घडवा’, ‘कौटुबिक छळ हा अक्षम्य गुन्य असे विविध संदेश या वेळी फलकाच्या माध्यमातून देण्यात आले.
या मोटर सायकल हेल्मेट रॅली प्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप-विभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत, पोलीस उप अधीक्षक (गृह) प्रमोद पवार, जळगाव उप विभागातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इतर महिला अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. रॅली यशस्वीतेसाठी पोउपनिरी. श्रीमती रेश्मा अवतारे व पोलीस वेल्फेअर पथकाने परीश्रम घेतले.