नऊ गावठी कट्टे, 20 जिवंत काडतुस, 2 मॅगझीनसह चौघांना अटक

जळगाव : नऊ गावठी कट्टे, विस जिवंत काडतुस आणि दोन रिकाम्या मॅगझिनसह चौघांना चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. हरजनसिंग प्रकाशसिंग चावला (रा. पारउमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी म.प्र.), मनमीतसिंग धृवासिंग बर्नाला (रा. पारउमर्टी, ता. वरला, जिल्हा बडवाणी म.प्र), अलबास दाऊद पिंजारी (रा. महादेव चौक बाजारपेठ हरिविठ्ठल नगर, जळगांव) आणि अर्जुन तिलकराज मलीक (रा. एकता नगर, चमरंग रोड अमृतसर, राज्य पंजाब) अशी शस्त्रांसह अटक करण्यातआलेल्या चौघांची नावे आहेत.

10 मार्च रोजी चोपडा तालुक्यातील पारउमर्टी येथील दोघे जण अवैध अग्नीशस्त्राची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. या शस्त्रांची खरेदी विक्री कृष्णापुर शिवारात उमर्टी रस्त्यावरील घाटात होणार असल्याची अधिकची माहिती देखील पोलिस प्रशासनाकडे आली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस पथक  सक्रीय झाले होते. दरम्यान दोन मोटार सायकलींवरील चौघा संशयीतांना अडवून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील पोत्यातून नऊ गावठी कट्टे, विस जिवंत काडतुस आणि दोन रिकाम्या मॅगझिन हस्तगत करण्यात आल्या. हरजनसिंग प्रकाशसिंग चावला, मनमीतसिंग धृवासिंग बर्नाला, अलबास दाऊद पिंजारी आणि अर्जुन तिलकराज मलीक या चौघांना गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली, चार मोबाईल हॅंडसेट व शस्त्रांस्त्रांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.

पोहेकाँ शशीकांत हिरालाल पारधी यांच्या फिर्यादीनुसार चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गु.र.नं.39/24 भा.द.वि. कलम 353, 504, 323, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, म.पो.अॅक्ट कलम 37(1) (3) चे उलंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. कावेरी कमलाकर यांच्या पथकातील पोहेकाँ शशीकांत पारधी, पोहेकाँ किरण पाटील, पोकॉ गजानन पाटील, पोकाँ संदिप निळे, होमगार्ड थावऱ्या बारेला, सुनिल धनगर, श्रावण तेली, संदिप सोनवणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील अलबास दाऊद पिंजारी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी महाराष्ट्रासह पर राज्यात जवळपास दहा गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here