तलवारीसह दहशत माजवणा-यास अटक

जळगाव : लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवणा-या  तरुणास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध  पथकाने ताब्यात घेत  त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पांडुरंग सपकाळे (रा. एस.एम.आय.टी.  कॉलोजवळ म्हाडा कॉलनी जळगाव) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

पांडुरंग सपकाळे हा त्याच्या ताब्यातील कारमधून तलवारीसह उतरतांना आढळून आल्याने त्याला त्याच्या ताब्यातील कार आणि तलवारीसह त्याला ताब्यात घेण्यात आले. पो.कॉ. नितिन ठाकुर यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, पो.कॉ. मुकेश पाटील, साईनाथ मुंडे, छगन तायडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. हे.कॉ. रामकृष्ण पाटील पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here