प्रविण सपकाळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्याध्यक्ष पदी निवड

मुंबई – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी जळगाव येथील प्रविण सपकाळे यांची निवड झाली आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्य कमिटीच्या बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.यावेळी संघटनेचे राज्य महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे व राज्यभरातील विभागीय अध्यक्ष,जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पत्रकार संघाचे उपक्रमशील पदाधिकारी असलेले उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेले प्रवीण सपकाळे यांची राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. श्री. सपकाळे यांना सर्व राज्य कार्यकारीणीच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here