भुसावळ रेल्वे स्टेशनवर आरपीएफ निरीक्षकाला विक्रेत्यांची मारहाण

जळगाव : भुसावळ रेल्वे स्टेशनवर विक्रत्यांच्या दोन गटात निर्माण झालेला वाद सोडवतांना आरपीएफचे निरीक्षक राधाकिशन मीना व त्यांचे सहकारी आरक्षक महेंद्र कुशवाह यांना विक्रेत्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. रेल्वे स्टेशनवरील विक्रेत्यांची मुजोरी वाढण्यामागे कुणाची शक्ती आहे याबाबत चिंतन करण्याची वेळ या घटनेच्या निमित्ताने आली आहे. 

गाडी आल्यावर खाद्य पदार्थांची कुणी कोठे विक्री करावी, यावरून विक्रेत्यांमध्ये वाद वाढला होता. वाद वाढत असल्याचे बघून आरपीएफचे एएसआय दीपक तायडे यांनी राधाकिशन मीना यांना घटनस्थळी बोलावले. मीना घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी वाद मिटवून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

परंतु जमावामधील सद्दाम शेख बशीर, आझाद शेख बशीर, शेख सलमान शेख बशीर, मुझफ्फर सय्यद लियाकत अली, शेख समीर शेख हमीद, वसीम खान बिस्मिल्ला खान व इतरांनी निरीक्षक मीना व आरक्षक महेंद्र कुशवाह यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी जीआरपी पोलिस स्टेशन, भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here