रविवारपासून रेल्वेचा तीन दिवस मेगा ब्लॉक

मनमाड : दि. 14, 15, 16 एप्रिल 2024 रोजी मनमाड भुसावळ लोह मार्गावरील रेल्वेच्या अत्यंत व्यस्त समजल्या जाणाऱ्या चाळीसगाव येथे जम्बो ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे देवळाली-भुसावळ मेमू, मुंबई-धुळे तसेच नाशिक रोड बडनेरासह अन्य काही महत्वाच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दि. 15 एप्रिल रोजी डाऊन मार्गावर सकाळी 7 ते 9.30 असा अडीच तास, दि. 15 एप्रिल रोजी अप लाइनवर दुपारी 12 ते 2.30 असा अडीच तास, तर दि. 16 एप्रिल रोजी अप डाऊन अशा दोन्ही रेल्वे मार्गावर सकाळी 7 ते दुपारी 12.30 असा साडेपाच तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. या ब्लॉकमुळे नाशिक, मनमाड, भुसावळ दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

डाऊन मार्गावरील रद्द गाड्यांची नावे आणि तारीख पुढीलप्रमाणे – देवळाली भुसावळ मेमू (11113) दि. 14 आणि 15 एप्रिल रोजी, 11119 ईगतपुरी भुसावळ मेमू दि. 14, 15 एप्रिल, मुंबई नागपूर सेवाग्राम (12139) 14, 15 एप्रिल, कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस (11039) 12, 14 एप्रिल, पुणे भुसावळ एक्स्प्रेस (11026) 14, 15 एप्रिल 

अप मार्गावरील रद्द गाड्यांची नावे आणि तारीख पुढीलप्रमाणे – भुसावळ देवळाली (11114) 13 आणि 14 एप्रिल, भुसावळ इगतपुरी (11120) 14, 15 एप्रिल,  नागपूर मुंबई (12140) 13, 14 एप्रिल, गोंदिया कोल्हापूर (11040) 14, 16 एप्रिल, भुसावळ पुणे (11025) 14, 15 एप्रिल रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय 11012 मुंबई धुळे दि. 14 आणि 15 एप्रिल रोजी तर 11011 धुळे मुंबई दि. 15 आणि 16 एप्रिल रोजी, 01211 बडनेरा नाशिक रोड मेमू दि. 14, 15, 16 एप्रिल तर 01212 नाशिक रोड बडनेरा मेमू दि. 14, 15, 16 एप्रिल रोजी रद्द आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here