वॉन्टेड मोटार सायकल चोरटा गजाआड

जळगाव : मोटार सायकल चोरीच्या तीन गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आकाश विठ्ठल कोळी (रा. रिधुर ता.जि. जळगाव) असे त्याचे नाव आहे. तो अमळनेर पोलिसांना हवा होता. तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल गुन्हेगार आहे. 

अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आल्यानंतर आकाश कोळी याच्या दोघा साथीदारांकडून चोरीच्या तीन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या होत्या. हे गुन्हे उघडकीस आल्यापासून आकाश कोळी फरार होता. तो रात्री अपरात्री विदगाव, कानळदा, रिधुर भागात येत असल्याची माहिती समजल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हे.कॉ.जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, चालक अमंलदार भारत पाटील, प्रमोद ठाकुर आदींचे पथक त्याच्या मागावर होते. या पथकाने सलग दोन दिवस अहोरात्र मेहनत घेत माग काढत आकाश विठ्ठल कोळी यांस रिधुर गावातुन तो रहात असलेल्या घराजवळून त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई कामी त्याला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here