जळगाव एमआयडीसीत भीषण आग

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीत भीषण आगीची घटना आज सकाळी घडली. आगीच्या या घटनेत सुमारे 15 कर्मचारी जखमी झाले असून त्यांना नजीकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असल्याचे समजते.

एमआयडीसी परिसरातील गोपाल दालमिल नजीक मौर्या ग्लोबल केमिकल कंपनीत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही आगीची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आग एवढी भीषण होती की त्यात कंपनीचे 15 कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून शर्थीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here