जत्रेतील मोबाईल चोरणारा गजाआड

जळगाव : जत्रेतील गर्दीचा गैरफायदा घेत गरीब तरुणाचा मोबाईल चोरून देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी रुपेश प्रभाकर माळी असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. जत्रेतून मोबाईल चोरी झाल्या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

दिनांक 13 एप्रिल 2024 च्या रात्री कानळदा गावी भरलेल्या जत्रेतून हा मोबाईल चोरीचा गुन्हा घडला होता. मोबाईल चोरी झाल्यामुळे सर्वसामान्य घरातील तरुणाने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला धाव घेत आपली आपबिती कथन केली होती. तपासाअंती आणि गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून हा गुन्हा रुपेश प्रभाकर माळी याने केल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील अंमलदार रवी नरवाडे, राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, संदीप साळवे, अकरम शेख, नितीन बाविस्कर, भारत पाटील आदींनी या तपासाकामी पावले उचलत रुपेश माळी याची शोध मोहीम सुरु केली.

आरोपी रुपेश प्रभाकर माळी यास बांभोरी येथून चोरीच्या विवो कंपनीच्या मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले. त्याने हा गुन्हा आपल्या साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे कबूल केले. त्यास पुढील कारवाईकामी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी गोमांस वाहून नेत असल्याच्या संशयावरून महामार्गावर एका वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेत रुपेश माळी याचा सहभाग होता. अटकेतील रुपेश माळी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here