भ्रष्ट, अपात्र कर्मचारी मोदी सरकारच्या निशाण्यावर

नवी दिल्ली : मोदी सरकार आता भ्रष्ट आणि अपात्र सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाईच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकारने अशा कर्मचार्‍यांना ओळखण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. भ्रष्ट व अपात्र कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीसाठी देखील आग्रह धरला जात आहे.
सरकारी कर्मचार्‍यांचे रेकॉर्ड केंद्र सरकारकडून तपासले जाणार आहे. जे कर्मचारी भ्रष्ट व अपात्र आढळून येथील त्यांना निवृत्त होण्यास सांगितले जाईल. त्यासाठी एक रजिस्टर तयार करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या सेवेत ३० वर्ष पूर्ण केलेल्या अथवा ५०-५५ वर्ष वय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेची नोंद तपासली जाणार आहे. या नोंदीत अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी व्ह्यायला हवी असे केंद्र सरकारने म्हटले आहे. सर्व माहितीची नोंद असलेले एक रजिस्टर कार्मिक मंत्रालयाने सर्व सचिवांना तयार करण्यास सांगीतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here