जळगाव जिल्हा पोलीस दलातील आठ अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त

जळगाव : आज 30 एप्रिल 2024 रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलातुन 8 पोलीस अधिकारी- अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन गिरधर लोखंडे, अंबादास नारायण पाथरवट, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शालीग्राम पाटील, शिवलाल पंडीत गालफाडे, मंगलसिंग मागो पाटील, सहाय्यक फौजदार प्रदिप मुरलीधर पाटील, पोलीस हेडकॉन्सटेबल ओंकार जगन्नाथ तळेले, पोलीस शिपाई अशोक हरसिंग पाटील असे पोलीस अधिकारी- अंमलदार आज सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्तांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रमोद पवार यांच्या हस्ते कुटुंबासह सत्कार करुन निरोप देण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत, कार्यालयीन अधिक्षक प्रविण पवार, पोउपनिरीक्षक रेश्मा अवतारे, मानव संसाधन विभाग आदींसह पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोउपनिरीक्षक, रावसाहेब गायकवाड, पोहेकॉ सतिष देसले यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here