आजचे राशी भविष्य

मेष
योगासने व ध्यानधारणा तुम्ही शारिरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम रहाल. आज घरातून निघतांना थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. त्यामुळे तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ
आज तुम्हाला आशादायक वातावरण अनुभवास येईल. एखादा जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्याचा तुम्हाला सल्ला देऊ शकतो. हा सल्ला अमलात आणल्यास तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन
निराशावादी विचारसरणी टाळा. संयुक्त प्रकल्पात अथवा संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. एखाद्या बड्या व्यक्तींबरोबर तुम्ही फिरलात तर करिअरमध्ये तुम्ही उंची गाठू शकाल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमचे खास लक्ष दिले जाईल.
कर्क
आज तुमचे आरोग्य एकदम चोख असेल. खर्च वाढले तरी त्या तुलनेत तुमचे उत्पन्न देखील वाढेल. कार्यालयीन कामे यशस्वी होतील. सहकारी आणि वरिष्ठ दोघांचे चांगले सहकार्य तुम्हाला मिळेल. तुमच्या आत्मविश्वासाचा फायदा घ्या.
सिंह
आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुयोग्य राखा. शेअर बाजारात पैसा लावल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामांना वेळेच्या आत पुर्ण करा. जोडीदारासोबत झालेला वाद सायंकाळपर्यंत मिटेल.
कन्या
इतरांसोबत आनंद वाटून घेतल्याने आपले आरोग्य बहरुन जाईल. आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्येमुळे चिंतीत राहू शकतात. त्यासाठी एखाद्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्यावा. आजच्या दिवसाचे काळजीपूर्वक नियोजन करा.
तुळ
आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेतांना विचारपुर्वक करा. आपल्या वेळेची किंमत लक्षात घ्या. समजा. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.
वृश्चिक
विनाकारण संघर्ष करु नका. खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सहकारी तुमच्या मदतीला येतील असे दिसत नाही. मात्र एखादी चांगली बातमी सायंकाळपर्यंत येवू शकते.
धनु

इतरांवर टीका करण्यात वेळ वाया घालवू नका. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आर्थिक बदल होण्याची शक्यता आहे. कामच्या ठिकाणी आज चांगला बदल झालेला दिसून येईल.
मकर
गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास हा लाभदायक व सकारात्मक ठरेल.
कुंभ

आज तुमचे स्वास्थ्य चांगले राहण्याची अपेक्षा आहे. नातेसंबंध नव्याने दृढ करण्यासाठी चांगला दिवस आहे. जे लोक परदेशातील व्यवसायाने जोडले आहेत त्यांना आज चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे.
मीन
आपले मानसिक व शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक जीवनाचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या – वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येत असतात. त्यामुळे मन हे आपल्या जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी मन मदत करेल आणि योग्य प्रकाशमार्ग दाखवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here