रावेरच्या आठव्या फेरीअखेर दिसली चुरस

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या आतापर्यंत आठ आणि जळगावच्या अकरा फे-या आटोपल्या आहेत. रावेरसाठी भाजपच्या तिकीटावर उभ्या असलेल्या उमेदवार रक्षा खडसे त्यांचे प्रतिस्पर्धी रा.कॉ.चे  उमेदवार श्रीराम पाटील यांच्यापेक्षा आठव्या फेरीअखेर 80636 मतांनी आघाडीवर आहे. त्यामुळे ही एकप्रकारे काट्याची लढत म्हणावी लागेल. आठव्या फेरीअखेर रक्षा खडसे यांना 209763 तर श्रीराम पाटील यांना 129127 एवढी मते मिळाली आहेत.

जळगाव लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या आतापर्यंत अकरा फे-यांचा निकाल हाती आला आहे. जळगावच्या अकराव्या फेरीअखेर सेनेचे करण पवार यांना 180715 मते मिळाली आहेत. याउलट भाजपच्या स्मिता वाघ  यांना अकराव्या फेरीअखेर 317319  अशी मते मिळाली आहेत. जळगावच्या तुलनेत रावेरमधे दोघा प्रतिस्पर्धी उमेदवारांमधे प्रचंड चुरस दिसून आली आहे. श्रीराम पाटील यांना आतापर्यंत मिळालेली मतसंख्या बघता सुमारे सव्वा लाख मतदारांचा खडसे यांना विरोध असल्याचे म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here