जळगाव : जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांवर भाजप विजयी झाला आहे. जळगाव लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या 24 व्या फेरीच्या अखेरीस सेनेचे करण पवार यांना 409417 मते मिळाली. याउलट भाजपच्या स्मिता वाघ यांना 651378 मते मिळाली आहेत.
रावेर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या 19 व्या फेरीअखेर भाजपाच्या रक्षा खडसे यांना 524480 एवढी मते मिळाली असून रा.कॉ. चे श्रीराम पाटील यांना 312418 मते मिळाली आहेत. त्यामुळे जरी रक्षा खडसे आघाडीवर असल्या तरी त्यांना तीन लाखाहून अधिक मतदारांचा विरोध असल्याचे दिसून येते. आगामी काळात श्रीराम पाटील हे प्रबळ स्पर्धक असतील.