कारागृहातून फरार आरोपी जेरबंद

On: June 7, 2024 6:57 PM

जळगाव : खूनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतांना कारागृहातून फरार झालेल्या आरोपीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तिघा कर्मचा-यांनी जेरबंद केले आहे. सुलतान भिकन तडवी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला सन 2010 मधे शालकाचा आर्थिक वादातून खून  केल्याचा गुन्हा दाखल आहे.  

त्याबाबत न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. सदर फौजदारी खटला सेशन केस क्रं. 188/2010  नुसार जिल्हा सत्र न्यायालयात चालवण्यात आला होता. त्यात सुलतान भिकन तडवी यास भादवि 302 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पैठण कारागृहात शिक्षा भोगत असतांना तो 30 मे 2024 रोजी पळून गेला होता.  आरोपी सुलतान तडवी यास जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथून पोहेकॉ. विनोद संभाजी पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने यांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment