अर्थव्यवस्था आणखी बिकट होणार ; रघुराम राजन

नवी दिल्ली : गेल्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जीडीपी – २३.९ टक्क्यांपर्यंत घसरल्यामुळे चिंता वाढली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था अजून खराब होण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन दिले आहेत. हा एक प्रकारे धोक्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका व इटलीपेक्षा मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याचे भाकीत रघुराम राजन यांनी केले आहे. कोरोनामुळे या दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

रघुराम राजन यांनी त्यांच्या लिंक्डइन पेजवर एक पोस्ट टाकली आहे. अर्थव्यवस्थेतील काही प्रमुख क्षेत्रांचा जीडीपी जाहीर झाला असून काही क्षेत्रांचा जीडीपी जाहीर होणार आहे. तो जाहीर झाल्यावर देशाच्या जीडीपीची अवस्था अजूनच बिकट होणार असल्याची भिती माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जात नाही, तोवर फारसा खर्च करता येणार नसल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमधे म्हटले आहे.

कोरोना संकटकाळात सरकारने आतापर्यंत दिलेली मदत पुरेशा प्रमाणात नसून भविष्यात प्रोत्साहन पॅकेज देण्यासाठी सरकार आज संसाधनं वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारची ही रणनिती आत्मघाती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोना नियंत्रणात आल्यावर दिलासा देवू, पॅकेज जाहीर करु असा विचार सरकारी अधिकारी करत असल्यामुळे त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजले नसल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. या मार्गानं गेल्यास पॅकेज जाहीर होईपर्यंत अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असेल, असं राजन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेची तुलना रुग्णाशी करत भाष्य केलं आहे. ‘अर्थव्यवस्था म्हणजे एखादा रुग्ण असल्याची कल्पना करत त्या रुग्णाला वेळोवेळी उपचारांची गरज आहे. कोरोना विषाणू नियंत्रणात येईपर्यंत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here