विविध चो-या घरफोड्या करणारा जेरबंद

On: January 9, 2025 9:40 PM

जळगाव : विविध ठिकाणी चो-या व घरफोड्या करणा-या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. प्रविण वसंत सपकाळे असे अटक करण्यात आलेल्या घरफोड्याचे नाव आहे.

2 जानेवारी 2025 रोजी सकाळी चार वाजेच्या सुमारास जळगाव शहराच्या चित्रा चौकातील जिल्हा कृषी औद्यौगिक सहकारी संस्थेच्या कापड दुकानाच्या दरवाज्याचे कुलुप तोडून दुकानातील डॉवरमधून आठ हजार रुपयांची रोकड चोरी झाली होती. याशिवाय दि. 6 जानेवारी रोजी सकाळी चार वाजेच्या सुमारास पोलन पेठेतील पॉप्युलर ट्रेडर्स या तेलाच्या दुकानासह योगेश प्रोव्हिजन या किराणा दुकानात आणि तिरुपती हेअर आर्ट या केश कर्तनालयाच्या दरवाजाचा कडीकोंडा व कुलुप तोडून चोरी झाली होती. या तिन्ही घटनांमधे 3600 रुपये रोख चोरी झाले होते. या सर्व घटनांप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हे नोंद करण्यात आले होते.

तपास पथक

या गुन्ह्यांच्या समांतर तपासात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रविण वसंत सपकाळे यास अजिंठा चौफुली परिसरातून ताब्यात घेत चौकशी केली. हे सर्व गुन्हे त्याने केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या कब्जातून 18 हजार 980 रुपये हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईकामी त्याला जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ राजेश मेढे, संजय हिवरकर, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, हरीलाल पाटील, प्रदीप चवरे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील आरोपीविरुद्ध यापुर्वी घरफोडीचे तिन गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment