राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. ची 1.69 कोटींची मालमत्ता जप्त

जळगाव : राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. ने स्टेट बँकेकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी ईडीने 12 फेब्रुवारी रोजी कारवाई केली आहे. या कारवाईत राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा.लि.ची 1 कोटी 69 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. नाशिकसह जळगावमधील संपत्तीचा या कारवाईत समावेश आहे. ईडीच्या नागपूर कार्यालयाने या कारवाईची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

या थकीत कर्जप्रकरणी स्टेट बँकेने दिल्ली सीबीआयकडे दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17  ऑगस्ट 2023 रोजी ईडी पथकाने जळगावला आर एल समूहाची तपासणी केली होती. त्यानंतर वेळोवेळी तपासणी व कारवाई सुरुच होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here