हल्लेखोर दहशतवाद्यांना शोधून ठार करा – फिरोज दोसानी

घाटंजी – यवतमाळ : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात देशाच्या विविध भागातील २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ महाराष्ट्रीयन नागरिकांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशात शोककळा पसरली असून अत्यंत निंदनीय आणि संतापजनक अशा या दहशतवादी हल्ल्यानंतर जनसामान्यात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी माहूरगडचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केली आहे.

जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप आणि निःशस्त्र पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ला केवळ मानवतेविरोधी नाही, तर आपल्या देशाच्या एकतेला, अखंडतेला आणि शांततेला दिलेली थेट धमकी आहे या शब्दात नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी तीव्र शब्दात निषेध करत या अमानुष हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व पर्यटकांच्या ज्यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त केल्या.

मृतकांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याने सांगून त्यांनी दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या या सर्व दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मास्टर माइंडला शोधून त्यांना ठार करा अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here