जळगाव : चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करत तीला गर्भवती करणा-याविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला पोस्कोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील अत्याचार करणा-या संबंधितांच्या घरी मेहुणबारे येथे तसेच चाळीसगाव तालुक्यातील पिडीतेच्या राहत्या घरी वेळोवेळी हा प्रकार घडला. कुणाला हा प्रकार कथन केल्यास तुला मारुन टाकेन अशी धमकी पिडीतेला अत्याचार करणा-याकडून मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सुहास आव्हाड पुढील तपास करत आहेत.