ट्रक चालकास मारहाणीसह रक्कम चोरी करणारे दोघे गजाआड

जळगाव – ट्रक चालकास मारहाण करून त्याच्या ताब्यातील पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या दोघांना चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. या गुन्ह्यात अजून दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असून त्यांना बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. कन्हैया जितेंद्र देठे (रा. नारायणवाडी, इंदिरानगर झोपडपट्टी, चाळीसगाव) आणि अभय सुभाष राखुंडे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चाळीसगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत या घटने प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

चांद पाशा फखीर पाशा सय्यद (रा. याकुबपुरा, बसवाकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) यांनी याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल दिली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक सय्यद सायकर, मनोज पाटील, हेकॉ अजय पाटील, नितीश पाटील, पोना आगोणे, पो.कॉ. गोपाळ पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here