सहज मिळणा-या गावठी पिस्टलने आत्महत्या    

Handgun isolated on white

जळगाव – जळगाव जिल्ह्यात गावठी कट्टे सहज मिळू लागले आहेत असे म्हटले जात आहे. आजपर्यंत जळगाव जिल्हा पोलिस दलाने कित्येक गुन्हेगारांना गावठी कट्ट्यांसह अटक केली आहे. अग्नीशस्त्राविरुद्ध कित्येक गुन्हे विविध पोलिस स्टेशनला दाखल झाले आहेत. मात्र गावठी कट्ट्यांची आवक काही केल्या थांबत नसल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. आज 12 मे 2025 रोजी सकाळी भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट भागात एका सामान्य नागरिकाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोळी झाडून घेणारी व्यक्ती सामान्य व्यक्ती असली तरी काही दिवसांनी अशी घटना सामान्य होता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भुसावळ शहराच्या गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी असलेले डिगंबर बढे यांनी स्वत:च्याच डोक्यात ते घरी एकटे असतांना गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गोळी झाडून घेणा-या डिगंबर बढे यांच्याकडे जी पिस्टल होती तीचा त्यांच्याकडे परवाना नव्हता. ते एका ट्रॅव्हल्स फर्म मधे मेंटेनंस विभागात कामाला होते. व्हीआयपी व्यक्तींच्या जीवीताला धोका असतो. त्यामुळे त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्टल असते. मात्र आता पिस्टल परवाना घेण्याची गरज उरली नसल्याचे या घटनेच्या निमीत्ताने म्हटले जात आहे. ज्याला वाटले तो विनापरवाना आपल्या ऐपतीप्रमाणे कमी अधिक किमतीचे पिस्टल विकत घेऊ शकतो असे देखील या निमीताने म्हटले जात आहे. या घटनेची भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली असली तरी जळगाव जिल्ह्यात सहज मिळणारे गावठी पिस्टलचा प्रश्न या घटनेच्या निमीत्ताने ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here