जळगाव – तेलंगणा राज्यातील खूनाच्या गुन्ह्यातील संशयितआरोपीस जळगाव स्थानिक पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आले आहे. अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पुढील कारवाईकामी त्याला तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तेलंगणा राज्याच्या सायबराबाद पोलीस आयुक्तालय अंतर्गत चंदानगर पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे तिन महिन्यापुर्वी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) हा गुन्हा घडल्यानंतर व दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेत चंदानगर पोलीस स्टेशनचे पथक जळगावला दाखल झाले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेत त्यांनी अजहर खाटीक याचा ताबा घेण्यासाठी मदत मागितली.
पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना पुढील कारवाईच्या सुचना दिल्या. सहायक फौजदार विजयसिंग पाटील व पोहेकॉ अक्रम शेख यांनी माहिती घेत फरार संशयीतास ताब्यात घेत त्याला तेलंगणा पोलीसांच्या हवाली करण्यात आले.