जळगाव – अल्पवयीन चोरट्याकडून त्याने चोरी केलेले दोन लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने हस्तगत केले आहे. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील नशेमन कॉलनी भागात राहणाऱ्या तन्वीर मजहर पटेल यांच्या घरातून 18 मे च्या रात्री दोन ॲप्पल कंपनीचे आयफोन आणि एक वन प्लस कंपनीचा मोबाईल चोरी झाले होते. गोपनिय बातमीदारांसह सिसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हा गुन्हा एका अल्पवयीन मुलाने केला असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार अधिक तपासात त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पुणे शोध पथकातील पो उ नि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पो हे कॉ रामकृष्ण पाटील, पो कॉ किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकुर, योगेश बारी, योगेश घुगे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करत आहेत.