यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कार्यक्रम सुधारणा विशेष मोहीमे अंतर्गत राज्याच्या ३५८ तालुक्यातील १०,००० शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगीरी केली आहे. त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाचे कौतुक केले आहे. वणी (जिल्हा – यवतमाळ) येथील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अमरावती विभागातून प्रथम आले आहे.
या यशाचे श्रेय वणीचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस उप निरीक्षक अरुण नाकतोडे, पोलीस हवालदार प्रदीप ठाकरे, विजय वानखडे, पोलीस हवालदार इक्बाल शेख (शिरपूर पोलीस स्टेशन), महीला हवालदार उमा करलुके, वैशाली गाडेकर, अमोल नुनेरवार, अतुल पयधान व उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांना देण्यात येत आहे.
पोलीस विभागांच्या प्रत्येकी महसुली विभागातील उत्कृष्ट ३ तालुका कार्यालयाची निवड करतांना बेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयी सुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यावर सर्वच तालुका स्तरावरील अधिका-यांनी केलेल्या कामगीरी बद्दल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
वणी येथील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात डायल ११२ ला उत्तम प्रतिसाद मिळाला असून वणी पोलीस स्टेशन ५१७, मारेगांव पोलीस स्टेशन १०९, शिरपूर पोलीस स्टेशन ७२, मुकूटबन पोलीस स्टेशन ८५ व पाटण पोलीस स्टेशन ५८ नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. वणी उप विभागात ३६७ व्यक्तींची १ कोटी २९ लाख ७४ हजार ५६ रुपयाची मालमत्ता परत करण्यात आली आहे. तर २१२१ मालमत्ते पैकी १२१२ मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार विल्हेवाट लावण्यात आले आहे. आपले सरकार पोर्टल वर दि. ३० एप्रिल २०२५ पुर्वीच्या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे वणी उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासह त्यांना व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी व्हॉलीबॉल ग्राऊंड व सुसज्ज जिम सुरु करण्यात आली असल्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने दिली आहे.