जळगाव : दिवसा घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 25 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करणा-यास मेहुणबारे पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या सोन्याची सराफाकडे वितळवून तयार केलेली 33 ग्रॅम वजनाची 3 लाख 20 हजार रुपये किंमतीची लगड हस्तगत करण्यात आली आहे. प्रविण सुभाष पाटील (रा. बिलवाडी, ता. जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील रहिवासी दिपक नामदेव पाटील हे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून 16 ते 18 मे 2025 या कालावधीत लग्नकार्यासाठी गेले होते. या कालावधीत त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप उघडून अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन घरफोडी केली होती. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे व सुहास आव्हाड, पोहेकॉ गोकूळ सोनवणे, किशोर पाटील, शांताराम पवार, पो.कॉ. विनोद बेलदार, संजय लाटे, निलेश लोहार आदींनी तांत्रीक व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या सहा तासात हा गुन्हा उघडकीस आणला.