घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्हा पोलिस दलात अधिकारी वर्गाच्या बदल्या करण्यात आल्या असून आता घाटंजी पोलिस स्टेशनलची सुत्रे पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्याकडे आली आहेत. केशव ठाकरे हे आर्णी पोलिस स्टेशन येथून घाटंजी येत आहेत. घाटंजी पोलिस स्टेशनचे निलेश सुरडकर हे ठाकरे यांच्या जागी आर्णी येथे बदलून जात आहेत.
यवतमाळ जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलीस कायदा – १९५१ मधील कलम २२ (न) नुसार, यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक (POLICE INSPECTOR) यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या व नेमणूका जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केल्या आहे.
बदल्या झालेल्या इतर अधिका-यांची नावे व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे आहेत. कंसात पुर्वीचे ठिकाण आहे. पोलीस निरीक्षक अनिल बहेराणी (यवतमाळ विशेष शाखा) – नेर, पोलीस निरीक्षक प्रशांत कावरे (यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन) – जिल्हा विशेष शाखा, सुनील नाईक (आर्णी) – यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन, निलेश सुरडकर (घाटंजी) – आर्णी पोलीस स्टेशन केशव ठाकरे (आर्णी) – घाटंजी पोलीस स्टेशन. बदली व नेमणूकीच्या जागी संबंधीत पोलिस अधिका-यांनी संबंधीत अधिका-यांना चार्ज हस्तांतरीत करुन पुढील चार्ज घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी दिले आहेत.