जळगाव : वेळोवेळी झालेल्या भेटीचे फोटो आणि मोबाईलवरील चॅटींग व्हाटसअपच्या माध्यमातून नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार करणा-या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून या तरुण – तरुणीच्या भेटीगाठी आणि चॅटींगचा प्रकार सुरु होता. जळगाव शहराच्या एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.
जळगाव जिल्ह्यातील रहिवासी तरुणी आणि बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरजवळा गावचा रहिवासी तरुण यांच्यात इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर थेट भेटीत आणि चॅटींगमधे झाले. तरुणाने तरुणीसोबत झालेल्या भेटीचे फोटो आणि चॅटींग त्यांच्या मोबाइलमध्ये सेव्ह करुन ठेवले.
ते फोटो आणि चॅटींग तरुणीच्या आई वडिलांना दाखवण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वेळोवेळी शरीरसंबंध सुरु केले. या शरीरसंबंधाचे व्हिडिओ देखील त्याने तिच्या अपरोक्ष तयार करुन ते व्हिडिओ देखील नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देण्याचा प्रकार त्याने सुरु केला. एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.