जळगाव – दहशत माजवण्याच्या इराद्याने गावठी कट्ट्यासह वावरणाऱ्या तरुणास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल संजय पवार असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून मॅगझीनसह तीस हजार रुपये किमतीचा कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे भिलाटी मेहरुण परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिस उप निरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, रवि नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, पोहेकॉ हरिलाल पाटील, विजय दामोदर पाटील, अक्रम शेख, प्रविण भालेराव, किशोर पाटील, प्रदीप चवरे आदींनी या कारवाईस सहभाग घेतला.