घाटंजी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

घाटंजी, यवतमाळ : घाटंजी तालुक्यात आगामी सण – उत्सवांच्या पार्श्वभूमीवर घाटंजी शहरात व तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी घाटंजी पोलीस ठाण्यात बकरी ईद निमीत्त (ईद – उज – जुहा) शांतता समितीची बैठक दि. २७ मे २०२५ रोजी बुधवारला पार पडली. ही बैठक नवनिर्वाचित ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजेश घोडके  हे उपस्थित होते. तसेच घाटंजी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी वर्ग, विविध धर्मीय समुदायाचे प्रतिनिधी, वृत्त संकलक, पत्रकार व पोलीस अधिकारी आदीं उपस्थित होते.

बकरी ईद निमीत्त शांतता समितीच्या बैठकीत घाटंजी शहरातील सण – उत्सव शांततेत व कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पाडण्यावर भर देण्यात आला. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणेदार केशव ठाकरे यांनी या वेळी दिला. सणांच्या काळात पोलीस गस्त वाढवण्यात येईल आणि आवश्यक तेथे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील निगराणी ठेवली जाईल, असेही पोलीस विभागातर्फे या वेळी सांगण्यात आले. सर्व धर्मीय नागरिकांनी आपापसात समन्वय ठेवून सण साजरे करावेत, शांततेचे वातावरण राखावे असे आवाहन, यावेळी ठाणेदार ठाकरे यांनी केले. उपस्थित सदस्यांनी पोलीस प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक करत पूर्ण सहकार्याची करण्याची ग्वाही दिली. आणि घाटंजी शहरात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचा निर्धार या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. 

यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय गढीया, संदीप मुनोत, शेतकरी संघटनेचे मोरेश्वर वातीले, सुनिल नगराळे, भाजपाचे संदीप माटे, निवृत्त पोलीस अधिकारी होमदेव किनाके, सैय्यद हफीज, कॉग्रेसचे विजय कडू, सामाजिक कार्यकर्ते मधुकर निस्ताने, आकाश जाधव, पत्रकार बाळ ठाकरे, कैलास कोरवते, संतोष अक्कलवार, संतोष पोटपिल्लेवार, अरूण कांबळे, अरविंद चौधरी, सागर सम्मनवार, जितेंद्र जुनघरे, निरज मन्ने यांच्यासह घाटंजी शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here