जळगाव : भुसावळ शहरातील एका लॉजमध्ये मुक्कामी दोघा बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली होती. या घटनेशी संबंधित दोघांना पुणे येथून दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुळ बांगलादेशी असलेल्या दोघी तरुणी दिल्ली येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. दरम्यान त्या भुसावळ येथे एका लॉज मध्ये मुक्कामी राहिल्या. दोघींचे आधार कार्ड संशयास्पद वाटल्याने लॉज व्यवस्थापकाने याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथकाने तपास केला असता दोघींचे आधार कार्ड बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी पुणे येथून पती पत्नीला अटक करण्यात आली आहे.