तब्बल १७८ विद्यार्थ्यांचे वाढवले गुण : मुल्यमापन प्रमुख अटकेत

पुणे : बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणांचे पुर्नमुल्यमापन करताना तब्बल १७८ विद्याथ्याचे गुण वाढवणारा मुल्यमापन प्रमुख पुणे सायबर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

संदीप रामकृष्ण हेंगले (४९) रा. वृंदावन अपार्टमेंट, गणेशमळा, सिंहगड रोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे सायबर पोलिसांनी संदीप हिंगले यास आज सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तपासकामी त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हेंगले यांचा साथीदार सुमित कुमार याचा तपास सुरु आहे.

पुणे येथील मॉडेल कॉलनीतील सिंबायोसिस मध्ये सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान हा गैरप्रकार घडला आहे. संदीप हेंगळे हे सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या मुल्यमापन विभागाचा प्रमुख अधिकारी आहे. आरोपी हेंगले हा सिम्बायोसिस संस्थेमध्ये नोकरीला असताना त्याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संस्थेच्या परस्पर संस्थेतील १७८ विद्यार्थीच्या बनावट केस हिस्ट्रीज तयार केल्या. त्या माध्यमातून संस्थेस अंधारात ठेवून त्याने संस्थेच्या संगणक प्रणालीद्वारे १७८ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क वाढवले.
आरोपी हेंगले याने वापरलेले डिव्हाईस संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल पेन ड्राईव्ह आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा करण्यासाठी आरोपीने इतर साथीदारांच्या मदतीने अर्थात टोळी स्वरुपात काम केल्याचे पोलिस तपासात दिसून आले आहे.

१७८ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क वाढवण्यासाठी आरोपीस धनलाभ झाला आहे. संबंधित विद्यार्थी व आरोपी यांचा संपर्क कसा झाला? ग्रेस मार्क वाढवण्याच्या बदल्यात आरोपीस किती रक्कम कशा पद्धतीने मिळाली? १७८ विद्यार्थी हे पुर्ण देशातील आहेत. त्यामुळे आंतरराज्यीय टोळी स्वरुपाचा हा गुन्हा झालेला आहे. गुन्हा घडला ती संस्था नामांकित असून संस्थेमध्ये आरोपी एकटाच ग्रेस मार्कसाठी केस हिस्ट्रीज तयार करु शकत नाही. संस्थेतील इतर कुणी कुणी त्याला मदत केली आहे का? याचा तपास बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. पोलिसांचा युक्तीवाद लक्षात घेता न्यायालयाने हेंगले १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here