पुणे : पुणे येथे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत भारती विद्यापीठ समोर असलेल्या कोविड टेस्टींग सेंटर मधे एक खळबळजनक घटना घडली. टेस्ट किट संपल्याचे नागरिकांना समजताच संतापाच्या भरात नागरिकांनी सामानाची आदळ आपट सुरु केली. त्यात चिडलेल्या नागरीकांनी मागचा पुढचा विचार न करता टेबलवर ठेवलेले स्वॅब सॅम्पल खाली फेकून दिले.
भारतीय विद्यापीठासमोर असलेल्या कोविड टेस्टिंग सेंटरजवळ तपासणीसाठी नागरिक सकाळपासून रांगेत उभे होते. दुपारी टेस्ट किट संपल्यामुळे नागरिकांना चाचणीसाठी नकार मिळाला. चाचणीसाठी नकार मिळताच नागरिकांच्या संतापात भर पडली.
स्वॅब घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर नागरिक धावून गेल्यामुळे स्बॅबचे सॅम्पल्स जमीनीवर पडले. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला तिघा नागरिकांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.