आजचे राशी भविष्य (16/09/2020)

मेष : ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. अडथळ्याची शर्यत आज प्रयत्न केल्याने पार पडेल. व्यापारी वर्गासाठी चांगला दिवस.

वृषभ : घरातील कामात वेळ वेळ खर्च होईल. बहुप्रतिक्षित कामे मार्गी लागतील. त्यामुळे मन प्रसन्न होईल.

मिथुन : आपल्या बोलण्यात मधुरता कायम ठेवा. न्यायालयीन कामे काही प्रमाणात मार्गी लागतील. मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करा.

कर्क : जुनी उधारी वसूल होण्याची शक्यता आहे. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. गरजूंना मदत केल्याने समाधान होईल.

सिंह : मान, सन्मान वाढेल. जुने मित्र भेटतील. भाग्याची भक्कम साथ लाभण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास सदैव कायम राहील.

कन्या : मानसिक स्थिती भक्कम राहील. कामाचा व्याप वाढेल. समस्यांचे निराकरण करण्याच प्रयत्न करा.

तुळ : घरातील अनेक दिवसांची प्रलंबीत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. संमिश्र घटनांचा दिवस राहिल. घाईने कोणतही निर्णय घेऊ नका.

वृश्चिक : विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत मार्गक्रमण करणे योग्य राहील. आध्यात्मिक आवड निर्माण होईल.

धनु : राजकीय सहकार्य लाभण्याची शक्यता आहे. व्यवहार करतांना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मकर : धनलाभाचे योग जुळून येण्याची शक्यता आहे. रोजगार प्राप्तीचे प्रयत्न फलदायी ठरण्याचे योग आहेत.

कुंभ : व्यक्तींची योग्य रितीने पारख करा. उत्तम कार्यशैली सोबत मृदू व्यवहाराचा लाभ होईल. एखाद्याला मदत कराल.

मीन : आहारात पथ्य पाळा. कला क्षेत्रातील व्यक्तींना योग्य काळ आहे. दिवसाच्या सुरुवातीला धावपळ होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here