पेट्रोल – डिझेलच्या किमती झाल्या अल्पशा कमी

तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव काही प्रमाणात कमी केल्या आहेत. पेट्रोलच्या भावात 13 ते 15 पैशांची कपात करण्यात आली आहे. डिझेलची किंमत 18 ते 20 पैशांनी कमी झाली आहे. यापूर्वी 30 जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलच्या किमती 8.36 रुपयांनी कमी केल्या होत्या. त्यामुळे दिल्लीत डिझेलची किंमत बाजारात प्रति लिटर 73.56 रुपये एवढी होती.

आयओसीएलच्या माहितीनुसार आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अशा आहेत. शहर (पेट्रोल) (डिझेल) दिल्ली (72.37) (81.40), कोलकाता (75.87) (82.92), मुंबई (78.85) (88.07), चेन्नई (77.73) (84.44)

आपल्या शहरातील पेट्रोल अन् डिझेलचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत समजू शकते. इंडियनऑईलच्या वेबसाइटनुसार आपल्याला आरएसपी आणि आपला शहर कोड टाईप करावा लागेल. तो एसएमएस 9224992249 क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहरासाठी कोड वेगवेगळा असतो. जो आपल्याला आयओसीएल वेबसाइटवर मिळू शकतो.

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलत असतात. नवीन दर सकाळी 6 वाजेपासून लागू आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन तसेच इतर घटक जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुपटीने होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर यावर त्या किमती अवलंबून असतात. त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर रोज बदलतात.

या मानकांच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमती निश्चित करत असतात. डीलर अर्थात पेट्रोल पंप चालक करासह त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडून ते किरकोळ दराने पेट्रोल विक्री करतात. पेट्रोल आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here