पुण्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

On: September 21, 2020 10:31 PM

पुणे : पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत आज मोठा शस्त्रसाठा जप्त केला. पुणे हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली. सराईत गुन्हेगारांकडून 18 गावठी पिस्तुले आणि 27 जिवंत काडतूस हस्तगत केली आहे. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली. यातील 4 आरोपी शिरुर परिसरातील आहेत. अटकेतील सर्वांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे.

पुण्यात शस्त्रे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सर्व गुन्हेगारी टोळीस अटक केली.
अरबाज खान, सूरज चिंचणे, कुणाल शेजवळ उर्फ यश, जयेश गायकवाड उर्फ जय, विकास भगत तौर उर्फ महाराज व शरद बन्सी मल्लाव अशी अटकेतील गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याकडून 18 पिस्तुलं, 27 जिवंत काडतुसे, एक चोरीची मोटार सायकल असा एकूण 5 लाख 68 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांची शहर आयुक्तालयातील ही सर्वात मोठी कारवाई म्हटली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment