जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील गुरांचा बाजार परिसरातील इलेक्ट्रीक दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. मातोश्री इलेक्ट्रीक या बंद दुकानाचे शटर वाकवून कुलुप तोडून चाळीस किलो वजनाची तार व इतर साहित्य चोरी झाले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हर्षल गोपाल परदेशी, कमलेश सुरेश पवार, रितेश निवृत्ती साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या तिघा चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्या कब्जातून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकलीसह एकुण नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणी खब-यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आला आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पो.उप निरी. चंद्रकांत पुंडलीक धनके, श्रेणी पो.उप निरी. विजयसिंग पाटील, पोहेकों रमेश चौधरी, पो.हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.हे.कॉ. किरण चौधरी, पो.हे.कॉ. गिरीश दिलीप पाटील, पो.हे.कॉ. मोतीलाल बोरसे, पो.ना. प्रदीप चौधरी पो. कॉ. नितीन ठाकुर, पो.कॉ. राहुल घेटे, पो.कॉ. किरण पाटील, पो.कॉ. गणेश ठाकरे, पो.कॉ. ललित नारखेडे, पो. अं. शशिकांत मराठे, पो.अं. रमाकांत साळुंखे यांचे पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.






