जळगाव पोलिस दलात तिघा अधिका-यांना प्रभारी पद

On: September 9, 2026 10:43 AM

जळगाव : जळगाव पोलिस दलात तिघा अधिका-यांना प्रभारी पद देण्यात आले आहे. यात शरद शेवाळे, निवृत्ती बो-हाडे आणि नितीन पाटील यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी या तिघा अधिका-यांच्या पदस्थापनेचे आदेश काढले आहेत.

जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे प्रभारी पद शरद शेवाळे यांनी दिले आहे. दरम्यानच्या कालावधीत जिल्हा पेठ पोलिस स्टेशनची धुरा सांभाळणारे सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ आता दुय्यम अधिकारी म्हणून कारभार बघणार आहेत. निवृत्ती बो-हाडे यांच्याकडे जामनेर पोलिस स्टेशनचा कारभार सोपवण्यात आला आहे. तसेच नितीन पाटील यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पद देण्यात आले आहे. निवृत्ती बो-हाडे हे रायगड येथून, शरद शेवाळे हे भंडारा येथून तर नितीन पाटील हे राज्य गुप्त वार्ता विभागातून आले आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment